Friday, October 29, 2010

अनिल अवचट : एक न आवडणं


बर्तोलुचीच्या शेल्टरिंग स्काय या चित्रपटाची सुरूवात मला आठवते. मोरोक्कोच्या किनार्‍यावर उतरलेले तीन अमेरिकन. त्यांतली नायिका फरक सांगते प्रवासाबद्दलच्या धारणेचा.
मी इथं आले ती ट्रॅव्हलर म्हणून, टूरिस्ट म्हणून नाही आणि मग, टूरिस्ट सहप्रवासी मित्राच्या चेहेर्‍यावरचे भाव वाचून ती पुढे म्हणते टूरिस्ट म्हणजे जो नव्या देशात येताक्षणी परत जाण्याची तारीख निश्चित करतो आणि ट्रॅव्हलरला नव्या देशात आलं की परत जाण्याची आठवणही होत नाही. प्रवास हेच त्याचं सर्वस्व!’
पण आता असे भटके (ट्रॅव्हलर्स) राहिलेत कुठे टूरिस्ट सारे! प्रवासी कंपन्यांच्या वेगवेगळ्या अवतारांना शरण. मला उच्चमध्यमवर्गीयांचं एक व्यवच्छेदक लक्षण ठाऊक आहे. भेटलं की केलेल्या प्रवासाबद्दल किंवा खाल्लेल्या पदार्थांबद्दल बोलत राहायचं! आजारी मनाचं लक्षण आहे ते किंवा सारी कामप्रेरणा नष्ट झाल्याचं. हनिमूनचे फोटो दाखवण्याचा मूर्ख अश्लीलपणा हे पण याच वर्गाचं लक्षण! जर अनुभवाला मनापासून सामोरं जायचं तर फोटो कोण काढील? दारू पीत त्या संबंधीची वर्णनं कोण सांगील? पण लग्नाच्या नात्यातला चार्म संपला की आमची युरोपची टूर आम्ही ठेक्कडीला गेलो होतो तेव्हा अशा गप्पा सुरू होतात बकार्डी पीत पीत...

आठवडाभर मी ट्विट करणार नाही असं जाहीर करत राजदीप सरदेसाई नाही का कर्नाटकात भटकायला गेला आणि त्याची बायको सागरिका घोष लिहीत होती आठवडाभर जगाला ट्विट करत नागरहोळे आणि काबिनी किती सुंदर आहे म्हणून! मनात आलं, अगं माझ्या बायो, जर ते इतकं सुंदर आहे तर एंजॉय कर आणि गप बस की. ट्विट करून जगापाशी बोंबलतेस याचा अर्थ आतूनच काहीतरी चुकलंय!”.
'आम्ही जगतो ती किती मज्जा' असं मध्यमवर्गीय लोक जेव्हा ठासून सांगू लागतात तेव्हा त्यांच्या कार्पेटखाली प्रचंड दांभिक कचरा साठतोय हे चाणाक्षपणे पाहता येतं.

या पब्लिकचं अजून एक व्यवच्छेदक लक्षण म्हणजे ते वाचण्यास सुरुवात करतात तेव्हा त्यांना पु.ल. देशपांडे आवडतात आणि पन्नाशीत येता येता, त्यांना अनिल अवचट थोर वाटतात! जे असुंदर आहे त्याच्या डोळ्यांत डोळा घालून पाहायचं एकदा का भयापोटी नाकारलं की मग सर्व गोष्टिंना सरसहा चांगलं म्हणणारा पोस्टमेनॉपॉझल समाजवाद हीच काय ती बुडत्याची काडी!

ठाण्याच्या मॅजेस्टिकमध्ये पुस्तकांचे गठ्ठे पडले होते. भोचकपणे मी एक पुस्तक खेचून बाहेर काढलं पुण्याची अपूर्वाई. बकाल पुण्यात राहणार्‍या बहुसंख्य पुणेकरांना अवचटांनी ही अपूर्वाई सप्रेम दिली हे म्हणतानाच मला हसू फुटलं. पु.. म्हणजे अपूर्वाईसाठी परदेशी जाणारे पहिल्या धारेचे समाजवादी कार्तिकेयस्वामी; तर अनिल अवचट म्हणजे दुसर्‍या धारेचे पुण्यालाच अपूर्व करून प्रदक्षिणेचं पुण्यं मिळवणारे पुणेरी गणपती!

पूर्वी वाचकांचं जग दोन भागांत विभागलं गेलं होतं. पुलं आवडणारे आणि पुलं नावडणारे; आता, नवीन जगात एकतर तुम्हाला अनिल अवचट आवडतात किंवा त्यांचा कंटाळा येतो. नाही आवडावं असं त्यांच्या लेखनात काही नाहीच. पण कंटाळा येण्यासारखं खूप काही आहे. त्यांचा दंभ किती मोहक आहे ? उगीच का वर्णी लागते कॉर्पोरेट आणि एन आर आय जगात त्यांची ? अनिल अवचट मला बोअर करतात. माझा राग अनिल अवचटांच्या लेखनावर नाही. राग येईल असं ते लिहीतच नाहीत, मुळी! पण त्यांच्या बिनमिठाच्या नॅरेटिव्हजनी मला सुपरकंटाळा येतो. इयत्ता आठवीपर्यंत मुलं किंवा नवीन मराठी शिकणारे परभाषिक यांनी अवचट अगत्यानं वाचावेत; मात्र नंतरही त्यांनाच कवटाळणार्‍या वाचकांचा पॅटर्न आता, मला प्रेडिक्ट करता येतो.

गुडी टु शूज माणसांना घासाघासानं संवेदनशीलता भरवणारे अवचट स्वत:च कसे कंटाळत नाहीत या प्रकाराला? असाही प्रश्न मला पडतो. पण मध्यमवर्गीय लोकेषणा भल्या भल्यांना सुटत नाही. त्यातल्या त्यात नीतिमान जगू इच्छिणारा हा वर्ग आहेच अ‍ॅडिक्टिव्ह. मध्यमवर्गीय माणूस संपूर्ण न मांडताच मध्यमवर्गीय जगणं रोम्यॅंटिक करून मांडायला हा लेखक जातो हाच तर माझा प्रॉब्लेम आहे. अरे माझ्या मध्यमवर्गीय भांडवलशाहीत राहून मिडिऑकर झालेल्या प्रॉडक्टांनो, हे घ्या माझं सामाजिक जाणिवेचं इंजेक्शन अशा आविर्भावात उपदेशामृताचे घुटके पाजणारे अवचट मला जाम वात आणतात.

माझ्या एका माजी सहकारणीला मी सांगत होते च्यायला, जगात साबुदाण्याची खिचडी आणि पाळीत गरम पाण्याची बादली या दोन गोष्टींनी अनेक पुरुषांची आयुष्यं उध्वस्त झाली आहेत महाराष्ट्रात. ही पुरोगामी बाईची पुरुषाला पान्हा फोडायची ईर्षा अवचटांनी ताडून त्यांनी लग्न या व्यवस्थेची जी पार्शल वर्णनं केलीत त्यांना मी (विनोबांच्या भाषेत) वाचाचौर्याचं लक्षण मानते. कारण तसं लग्न वास्तवात असताना त्यात खिचडीसोबात इतर कोणकोणत्या गोष्टी आणि नावडते विनिमयदेखील असतात त्या असुंदर भागाबद्दल अवचट अवाक्षर लिहीत नाहीत.

अगदी रॅश उदाहरण द्यायचं तर लोकांच्या घऱची देखणी कुत्री मला आवडतात. पण मग त्या प्रत्येक कुत्रीच्या पाळीच्या काळात तिची काळजी कोण घेत असेल? किंवा त्या कुत्रीला मेटिंगसाठी कुठे न्यायचं? ते कोण ठरवत असेल अशा प्रश्नांनी मी भानावर येते आणि माझ्या पाळीव प्राणिप्रेमाची तात्कलिक नशा उतरते. कुत्री पाळणं किती मज्जेशीर आहे ते लिहिणं आणि पाळलेली कुत्री निभावणं या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. त्या निभावण्याच्या प्रक्रियेतलं सारं असुंदर वगळून जे जग अवचट तयार करतात त्यामुळे त्या सद्‍गुणी लेखनाचा एडिटेड भाग मला अधिकाधिक खुणावू लागतो.

अवचट आवडणा-या वाचकांच सारं पॅकेजच नंतर उमगून येतं. ते पॅकेज वाईट नाही - प्रेडिक्टेबल आहे, बाय वन गेट वन फ्रीच्या हिशोबानं. मध्यमवर्गीय समाजवादावर अविर्भावात्मक शिवसेना-द्वेष फुकट, अभय बंगांच्या आदरासोबत दारु पिणा-यांची गुटख्याबद्दलची तिडीक फुकट, ओरिजिनॅलिटीचा अभाव आणि त्यावर आनंद नाडकर्णीचा अल्बर्ट एलिस फुकट!

44 comments:

  1. पुलं लोकप्रिय होण्यामागे एक कारण म्हणजे त्यांच्या विनोदाची जातकुळी अस्सल होती. दुसरे म्हणजे इंग्रजीत वुडहाउसनंतर डिकन्स, शेक्सपिअरपासून ते डोस्टोयेव्हस्की, काफ्कापर्यंत अगणित पर्याय असतात. मराठीत त्यामानाने पर्याय फारच कमी आहेत. त्यामुले वैविध्य हवे असेल तर इंग्रजी वाचन अपरिहार्य आहे आणि हे बर्‍याच लोकांना आवडत नाही.

    अवचटांचे काही लेख सोडले तर फारसे वाचलेले नाही. नाडकर्णींची पुस्तके लोकप्रिय आहेत हे चांगले लक्षण आहे असे वाटते. त्या विषयात मराठीत बोटावर मोजण्याइतकी पुस्तके आहेत, त्यांच्या लेखातील सल्ले बर्‍याच लोकांना उपयोगी ठरत असावेत.

    ReplyDelete
  2. Aapan laakhaat ek aahot yaachi jaaneev howoon bhitichaa lahaansaa shahaaraa tuzyaa angaawar yet naahi kaa kadhee?


    ......Awdhoot Parelkar

    ReplyDelete
  3. थॅन्क्यू व्हेरी मच.

    ReplyDelete
  4. हे काहीच्या काहीच आवडलं मला. (आवडलं हे फार कृत्रिम आहे, त्यामुळे मेघनाप्रमाणे फक्त एक मोठ्ठं थँक्यू!)

    ReplyDelete
  5. अगदी बरोबर गं. माणसं नंतर त्यांनी काही लिहिलं नसतं तरी चाललं असतं. आनंद नाडकर्णी पण तसंच. सगळं जग हा एक कंटाळवाणा सपोर्ट ग्रुप आहे आणि कमालीच्या इरिटेटिंग पेट्रनायझिंग टोनमधेच बोललं पाहिजे हे बंधनकारक असल्यासारखं.

    ReplyDelete
  6. Awchatanchya phakt lekhnabaddal mhanal tar me sahmat aahe. muktangan aani tyasandarbhatil Awchat vegle aahet. Pan lekhak mhanun awchat kharokhar kantalwane aahet. Te lihinyasathich jagtat ki kay ase watate. Karan jaglele bahutek sare lihun boar kartat. Mage ekda Nemade eka mulakhatit mhanale hote ki< makadwalyanche khel vagaire pahun tyavar lihine he maujechya susta wachkansathi asave.
    TRAVELLER AANI TOURIST GR8!

    ReplyDelete
  7. vijay
    anil avachat tumhala bore vaatane he vyaktee titakya prakrutee nyayane theekach aahe .. pan pudhe nemadencha ullekh maatra khatakala... kaaran doghehee avkash bharanyasathee lamban laavanare aahet... aata avchatancha anubhavvishva he shahari/puneree/ sadshivpethee/ pandharpeshee asalyane kunala milmilit/neeras vaatel tar nemadyancha anubhavdravya grameen/ krusheesnsruteecha/ bahujansamajacha asalyamule kunala rasabharit/ aapalasa vaatel, he kharach ... 'pan avkash bharanyasathee anubhav anathayee pinjun kaadhane' he sootra vicharat gheta doghahee baryapaiky ekach maaleche aahet... avchatancha ek bara aahe kee tyana aapala avakash bharana fictionalise karata yeu shakat nasalyacha bhaan aahe... tyamulech tyanee ajun kaadambree tar sodach pan saadhee laghukathahee lihilelee vaachanat naahee !-- Satish Tambe

    ReplyDelete
  8. Satishji,
    Barobar aahe tumche mhanane. Pan Nemadencha ullekh sahaj aathavla mhanun. 7-8 varshapurvi pragat diwali ankatli ti mulakhat asavi. ani mala te jaam aawadle hote, te ithe aathavle evdhech.

    ReplyDelete
  9. कैच्याकै एकदम.. एकही वाक्य अजिबात नाही पटलं. पूर्णतः असहमत !!

    ReplyDelete
  10. Some questions for you.

    1)Have you read all books, articles and interviews of Anil Awachat and Pu La?
    2)What's so wrong in being acceptable and popular?
    3)Regarding Pu La I would recommend you to read his books, articles and speeches which are published in his later days. These are no so best sell-able but profound.
    4)Social networks and micro blogging are great ways to speak out what one feels. Humans have been chatting since ancient times, they are doing it on Internet now, I don't think there is anything to be hated here.

    ReplyDelete
  11. ब्लॉग वाचला. करमणुक झाली. शैलीही आवडली. विचार पटो-न-पटो. त्याने काय फरक पडतो, नाही का? टिका करणं हां आपला जन्मसिद्ध हक्कच नसतो, तर ते आपल्या jenes मधेच असतं. भवानी तलवार जी महाराजांना मिळाली होती, ती आपल्या सर्वांनाही मिळाली असते. आणि आपण ती वरच्या खिशाला लटकावून वावरत असतो की. दिसला माणूस की काप त्याला. It is so natural to dislike someone or something...or rather everyone or everything. All of us are self-proclaimed experts in it. Aren't we?

    But this very COMMON characteristic makes some people very SPECIAL. These people's filters see only GOOD things in this otherwise ugly world. It makes a few further more special bcause after filtering those good things, they dont keep it to themselves...but share it with the others. अणि मी अवचट फारसे वाचले नाहीत. पण माझ्यामते पुलंनी ते केले. आता त्यातला खरेपणा किती आणि दिखावा किती हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण ते सिद्ध करता येणं खूप कठीण. पण मी म्हणतो...सिद्ध करायची काय गरज आहे? "अपुन को तो आम खाने से मतलब".

    पण मला कुठेसं अंधुक वाटुन गेलं की तुम्हाला problem पुल आणि अवचट यांच्याबरोबर नाहीये. तर त्याच्या वाचकांबरोबर आहे. You seem to have problems with the readers who instead of enjoying the book, love to flaunt it to the world. Is it? पण त्यांचा राग बापुडया लेखकांवर का काढ़ा?

    ReplyDelete
  12. At some level I think I do understand the author's psychology while writing this article.
    Although I do not agree with anything that she has written, however, her 'musings' are of a typical teenager (although i presume she is not!)who are usually bored of everything in general and would want to keep themselves entertained all the time. Such teenagers remain entertained by subjecting themselves to some form of fast-paced entertainment, ignoring 'relatively' slow-paced intelligent entertainment such as books or other simple pleasures of life.

    She has cited symbolic examples of tweeting or displaying honeymoon-photographs; however there is nothing wrong in making others a part of your experiences. In a similar way, even Ms. Deshpande does the same by blogging this article to the world...doesn't she?

    ReplyDelete
  13. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  14. “अगं माझ्या* बायो, जर ते इतकं बेकार आहे तर सोडून दे आणि गप बस की. ब्लॉग लिहून जगापाशी बोंबलतेस याचा अर्थ आतूनच काहीतरी चुकलंय!”.

    *मूळ वाक्यात फारसा फेरफार करायचा नाहीये म्हणून! 'माझ्या' या शब्दाचा शब्दार्थ घेऊ नये.

    अवांतर माहिती: 'पाळी' हा शब्द मराठीत menstrual cycle शी संबंधित असा वापरतात. कुत्र्यांना त्या अर्थाने पाळी येत नाही, कुत्र्यांमधे estrous cycle असतं. कुत्र्यांमधे वर्षातून दोनदा हे होतं, या काळात कुत्र्यांमधेही रक्तस्त्राव होऊ शकतो पण हे menses अथवा पाळी नव्हेत.

    ReplyDelete
  15. Dnyaanada तुम्हाला तुमच मत नक्की असू शकत...कोणाला काहीही बोर होऊ शकत, व्यक्ति तितक्या प्रकृति, पण आपन जेव्हा social networking sites वरती असे लेख लिहिता तेव्हा ते फ़क्त तुमच मत नसत, तुम्ही काढलेले निष्कर्ष असतात जे तुम्हाला सग्ल्यान्शी शेयर करायचे असतात.

    एक्साक्ट्ली हेच honeymoon ला गेलेल्या couple ला (until n unless they share uncensor photos), किंवा सागरिका घोष ला ती कर्नाटकात फिरत असताना एक्सप्रेस करावेसे वाटले तर वाईट काय त्यात.....तुम्ही ही अत्ता तुम्हाला जे व्यक्त कारावास वाटते तेच लिहिले ना....आपल्या देशात घट्नेनेच आपल्याला ते स्वातन्त्र्य दिले...आणि वापर्ताय की तुम्ही ते

    ओरिजिनॅलिटीचा अभाव आणि त्यावर आनंद नाडकर्णीचा अल्बर्ट एलिस फुकट!----dnyanadaa sorry to say this, पण ह्या वाक्यावरून तुम्ही आनंद नाडकर्णी ना पुरेसा वाचालाच नाहीये हेच मी म्हनू शकेन, अलबर्ट एलिस समजण्यासाठी सुध्हा खुप वाचाव लगत अणि समजुन घ्याव लगत, अणि सर्वात मह्ताव्च म्हणजे अवचट, नाडकर्णी ह्या लोकानी आयुष्यात खुप प्रोब्लेम्स फेस केले. अणि त्याबद्दल वेलोवेळी लिहिले. अव्चातानी तर आत्तापर्यंत प्रोब्लेम्स बद्दलच जास्त लिहिल. (तुमच्या माहिती साठी काही- धागे आडवे उभे, कोंडमारा, माणस, सुनंदला आठवताना किंवा हल्लीच मुक्तान्गंची गोष्ट ) पण प्रोब्लेम्स बरोबर ते त्याच जगातली चांगली बाजु ही बघू शकले अणि ती ही सगाल्यासमोर मांडली.
    अता हयात तुम्हाला काय इंट्रेस्टिंग वाटत अणि काय बोर होत हा तुमचा चोइस.

    खिचडीसोबात इतर कोणकोणत्या गोष्टी आणि नावडते विनिमयदेखील असतात त्या असुंदर भागाबद्दल अवचट अवाक्षर लिहीत नाहीत - avchatani लिहिलेत तुम्ही ते वाचले नाहित असा म्हणा हव तर (फॉर एक्स: सम पार्ट ऑफ़ स्वाताविशायी, सुनंदला आठवताना, मुक्तान्गंची गोष्ट)...अर्धवाट अभ्यास करून आरोप करने वाईट

    या पब्लिकचं अजून एक व्यवच्छेदक लक्षण म्हणजे ते वाचण्यास सुरुवात करतात तेव्हा त्यांना पु.ल. देशपांडे आवडतात आणि पन्नाशीत येता येता, त्यांना अनिल अवचट थोर वाटतात! - माला कामित कमी १०० लोक माहित आहेत ज्यानी अवचट वयाच्या १८ व्या वर्षापासून वाचले आणि.....आजतागायत वाच्ताहेत...

    मात्र नंतरही त्यांनाच कवटाळणार्‍या वाचकांचा पॅटर्न आता, मला प्रेडिक्ट करता येतो.........अवचट आवडणा-या वाचकांच सारं पॅकेजच नंतर उमगून येतं. ते पॅकेज वाईट नाही- प्रेडिक्टेबल आहे, ‘बाय वन गेट वन फ्री’च्या हिशोबानं...... म्हणजे एक्साक्ट्ली काय प्रेडिक्ट करता येत.... मला हे वाक्य अज्जिबात kalala नहीं...तुम्हाला kalala असेल तर pls सांगा...काहीतरी सामान गुणधर्म असतील ना त्या वाचकांचे....वानगी दाखल की ते gulchat असतात...प्रचंड बोर लोक असतात...असा काहीतरी

    nibandh cha zalaa maza comment deta deta :P

    ReplyDelete
  16. अवचट हे असे लेखक आहेत की त्यांच्या पाशी शैली आहे पण स्वतःची philosophy नाही
    खर्या अर्थाने ते लेखक नाहीतच तर साहित्यातले राजू guide आहेत
    कुठ काय मिळत ,निपानीचे लोक कसे राहतात , ड्रुग घेणार्यांच अवस्था कशी होते
    आजारपनात काय काय कराव , विद्यापीठात कोणती झाडे लावली आहेत
    देवदासी म्हणजे काय ? हमाल कसे जीवन जगतात या सर्व लेखात ते reporter आहेत
    हे आवडणारी खूप माणसे असतात ती आहेत म्हणून आपले वेगळेपण उठून दिसते नाही का ?
    पण नेमाडे ,शाम मनोहर आवडणारी माणसे थोर आणि बाकीचे छचोर हे equation मला मान्य नाही
    shubhaparanjpe@gmail.com

    ReplyDelete
  17. @ Harshad! We must appreciate that she has got an OPINION & i don't think its a borrowed one (opinion). Also i don't think her muse is of a typical teenager. ‘गुडी टु शूज’ माणसांना घासाघासानं संवेदनशीलता भरवणारे"...this kinda musing definitely needs applauds. In fact she looks to me as someone who is in complete love with the life or world...someone who likes to analyze everything that she gets her hands on. These kinda analytical skills are rare (unless she is a professional critic or analysts...i don't knw). Now about her style. I think...एका ब्राह्मणी पद्धतीने जेवण जेवण्यापेक्षा असं झणझणित आणि चमचमीत जेवण मला तरी खुपच आवडलं. परत एकदा..."विचार पटो-न-पटो. त्याने काय फरक पडतो?" :p

    @ Supriya...माफ़ करा, जर तिला कोणी ओळख़त नाही; याचा अर्थ असा नाही की तिने तिचे मत मांडू नये. कारण मी अणि तुम्ही सुद्धा आपलं मत मांडलच की? आपण सुद्धा कुठे "बाकीचं विसरलो". (Je je chhan ahe te ghya ...ani baki wisra ....) थोडीशी टिका सहन करायला...आणि त्याही पलिकडे जाऊन एन्जॉय करायला काय हरकत आहे? And we must appreciate her that she has shown courage to publish our comments. If she is taking all this criticism positively, then why cant u or me? :-)

    ReplyDelete
  18. फारच मस्त लिहिलंय ब्लॉग मध्ये !!
    अफलातून एकदम बिनधास्त !! मझा आगया यार !!
    एकदम मेंदूला झिणझीण्या आल्या वॉव !!
    Kalpana

    ReplyDelete
  19. जबरी! फार आवडले अगदी मनातल्या भावना उतरवल्या सारखं वाटलं! त्यांच मस्त मस्त उतार हे भयंकर कवितांचं पुस्तक वाचलं. नाडकर्णी आणि अवचट एकमेकांच इतकं कौतुक करतात की त्याचं भयंकर अजीर्ण होतं. कविता नको पण कौतुक आवर अशी वेळ झाली माझी!

    - निनाद

    ReplyDelete
  20. >>माझ्या एका माजी सहकारणीला मी सांगत होते “ च्यायला, जगात साबुदाण्याची खिचडी आणि पाळीत गरम पाण्याची बादली’ या दोन गोष्टींनी अनेक पुरुषांची आयुष्यं उध्वस्त झाली आहेत महाराष्ट्रात.<<

    ह्याचा नेमका अर्थ काय? पाळीत गरम पाण्याच्या बादलीविषयी काहीही कल्पना नाही पण साबुदाण्याच्या खिचडीने पुरुषांची आयुष्यं उध्वस्त???
    ह्याला अवचटांच्या लेखाचा संदर्भ असल्यास त्यावर थोडे विवेचन/पार्श्वभुमी द्यायला हवी होती.

    ReplyDelete
  21. http://mr.upakram.org/node/2977

    ReplyDelete
  22. ‘अरे माझ्या मध्यमवर्गीय भांडवलशाहीत राहून मिडिऑकर झालेल्या प्रॉडक्टांनो, हे घ्या माझं सामाजिक जाणिवेचं इंजेक्शन’ ही कमेंट तर भन्नाटच आहे.
    ...
    पुलंचा विनोद अतिशय शिळा आणि हिणकस एका वर्गासाठी लिहलेला वाटतो. एकदा वाचला की कंटाळा येतो. चिवि जोशी यांचा विनोद ताजा आहे मराठीत तरी. मराठीतला विनोदी लेखक म्हणजे चिवीच असे मला तरी वाटते. कारण जगण्याची विसंगती आणि मानवी स्वभाव निरागसता यावर ते भाष्य करतात. असो.
    पुल म्हणजे हाइप केलेले महाराष्ट्राचे चतुरस्त्र की काय असते तसे व्यक्तिमत्त्व वाटते. माणूस म्हणून चांगले असतील म्हणून लेखक म्हणूनही चांगले असावेत का? असो....
    ....
    हल्ली पुण्यात सगळ्या एक जोक फेमस आहे. सगळ्या कार्यक्रमांना बाबा असतातच. एक तर अवचट बाबा किंवा पुरंदरे बाबा! वीट आणलाय त्यांच्या त्याच त्याच सोकॉल्ड अस्मितांचा. पुरंदरेंची मराठी, शिवाजी महाराज अस्मिता. व अवचटांची खादी, समाजवादी आणि सोकॉल्ड संवेदनशील अस्मिता. अवचट तर एशियन पेंटचा लाल डबा घेऊनच फिरतात असे वाटते या माझा तोंड लाल करा म्हणत...

    ReplyDelete
    Replies
    1. मला खूपच उत्सुकता वाटते, तुम्ही नेमके काय काय वाचले आहे पुलंचं साहित्य?

      Delete
  23. pranav- joke superliked! thanks for the feedback.

    ReplyDelete
  24. मी १८ वय होण्याआधीच पुल-अवचट बाचणं बंद झालं (तोपर्य़ंत पुलंचं सगळं वाचलेलं, आवडलेलंही बेहद्द). खास बंद करावं लागलं नाही, कारण खूप वाचायला काही काही मिळतच होतं मराठी हिंदीत खूप चागलं. तशा अब्राह्मण व अमराठी मित्रमैत्रिणी मिळाल्या त्यांनी काय काय शिकवलं वाचायला. तेही बरेच जण पुण्यातही आले, आहेतही. नंतर इंग्रजी सुरू केलं मेहनत करून. पुण्यात फार राहिलो नाही गरजेशिवाय. एकूणात ज्ञानदा देशपांडेंसारखं या पुणेरी लोकांना सहन करणं किंवा त्य़ांच्यापासून येणारा वात सहन करणं भाग नाही पडलं.आनंद नाडकर्णींचं लिखाण उपयोगी वाटलं आणि वैद्यकसत्ता तर आवश्यक वाचनच, तरी अल्बर्ट एलिस माझ्या मानसोपचारवाल्या डॉक्टरनंच सुचवला व तोच पुरेसा पडला. पण एकूण वात आणण्याइतका हल्ला यातल्या कुणीच माझ्यावर केला नाही, कारण मी त्यांच्या माऱ्याच्या टप्प्यात नव्हतो. तेव्हा ज्यांना वात येतो त्यांनी आपलं मित्रमंडळ थोडं वाढवून बघावं, पुण्यातही अमराठी अब्राह्मणी संवेदनांचे वाचक लेखक आहेत, व ते पुल अवचट वगैरेंची दखल न घेता बरंच काही चवीचवीनं, आनंदानं, जोमानं, झडझडून, धाडकन, अनेक प्रकारे करतात. ज्ञानदा देशपांडेंचं हे लिखाण पुल अवचट नाडकर्णी यांच्या ठराविक वाचकांसाठिच झाल्यागत वाटलं त्यांना वातही त्यांच्या स्वतःच्या मर्यादित मित्रमंडळामुळं येत असेल. पुल वगैरे न वाचणारेच मित्र असतील तर नाही वात येणार, पण तसे मित्र व्हायले तर खरं! नीरा राडिया टेपनंतर तरी सर्व नामचीन पत्रकारांना गंभीरपणे घेणं बंद करसाल तर खरं. नाहीतर बसा ट्वीट वाचत आणि चिडत, एवढा वेळ आहेच वाचायला आणि चिडायला तर. ज्यांच्यावर चिडता त्यांचीच गिऱ्हाइकं बनण्यापलिकडं बरं काही घावतच नाही तुम्हाला तर! एक स्पष्टीकरण - इथं अमराठी म्हणजे अपुणेरी असा अर्थ घेणं.

    ReplyDelete
  25. ज्ञानदा, का गं एवढी चिडलीएस? काय वाचलंस अलिकडे अवचटांचं?
    अर्थात माझं मत तुझ्यापेक्षा फार वेगळं नाही. मी एकेकाळी अवचटांचा लेख म्हटलं की प्राधान्याने वाचायचे. पण हळूहळू मीही बदलत गेले, आणि अवचटांचं लिखाणही..त्यामुळे आता त्यांचं लिखाण बोअर होतं, याच्याशी मीही सहमत! आणि मला त्याबद्दल जरा सविस्तरपणे लिहावं वाटतंय..चालेल ना?
    अनिल अवचटांचं लिखाण वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या प्रकारचं आहे. सुरुवातीचं खरोखरच प्रामाणिकपणे समाजातल्या विसंगती टिपणारं लिखाण, पूर्णिया भन्नाटच होतं. नंतरचं माणसं, धागे-उभे आडवे पण चांगलं होतं. प्रत्यक्ष त्या त्या माणसांशी बोलून, त्यांच्याबरोबर राहून लिहिलेलं हे नक्कीच वाचकाला काही देणारं होतं.
    पण मग ते संपलं. प्रत्यक्ष भोगणाऱ्या माणसांशी बोलून, त्यांच्याबरोबर राहून लिहिणं मागे पडलं, त्याच्याऐवजी अभ्यासक, आंदोलनांचे नेते यांच्याशी प्रश्नांबरोबर बोलणं आणि तेवढ्यावरूनच प्रश्न समजून घेऊन लिहिणं सुरू झालं. लिखाणातली तीव्रता कमी झाली, पण तरीही समाजातले वेगवेगळे प्रश्न समजून घ्यायचा प्रयत्न करणाऱ्या माझ्यासारख्यांना अजूनही ते वाचनीय वाटत होते.
    मध्येच प्रश्नांना उत्तरं शोधण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. त्यातून अरुण देशपांडे (चळवळ? अरुण देशपांडेला चळवळ म्हणायचं?), अभय बंग - राणी बंग यांच्यावरचे भाबडे लेख झाले. मला त्या माणसांच्या कामाबद्दल, हिंमतीबद्दल खरंच आदर आहे, पण ती प्रश्नांवरची उत्तरं नाहीत हे तोपर्यंत मला ठामपणे कळलेलं होतं, त्यामुळे ते लेख खरंच भाबडे वाटले.
    तसं अवचटांचं गोंधळलेलं, बोटचेपं समाजवादीपण आधीच लक्षात यायला लागलं होतं. तेंदू पानांच्या प्रश्नाबद्दल लिहिता लिहिता अचानक त्यांच्या लक्षात येतं, अरे हे तेंदू पानं म्हणजे बिड्या, व्यसन..म्हणजे वाईटच की..मग? आता काय करायचं? आणि ते गोंधळून जातात. वेश्यांवरच्या त्यांच्या एका लेखात वेश्यांच्या नरकप्राय जिण्याबद्दल वाचता वाचता, हे असलं जिणं जगायला लावणाऱ्या समाजव्यवस्थेला सुरुंग लावला पाहिजे अशी चीड आपल्यामध्ये खदखदायला लागली असता हे मध्येच मग त्यांच्यातल्या काहीजणींना तरी बरं औषधपाणी आणि बरा निवारा पुरवणाऱ्या एनजीओंची भलामण करायला लागतात तेव्हा हसावं की रडावं ते कळेनासं होतं.
    पण तरी ठीक होतं. त्यांची लिखाणाची शैली चांगली आहेच. आणि हळूहळू त्यातला सामाजिक कन्टेन्ट कमी होत गेला तरीसुद्धा पुण्याची अपूर्वाई काय किंवा मिरजेचे तंबोरेवाले वगैरेंवरचे लेख काय, विरंगुळा म्हणून वाचायला अजूनही चांगले होते.
    मात्र, माझ्या मते आता त्यांच्याकडे लिहायला काही उरलेलं नाही. आणि त्यामुळे त्यांचं लिखाण खोटं, दांभिक झालंय. घरात कामाला येणाऱ्या मोलकरणींशीसुद्धा ते कसे अत्यंत प्रेमळपणे वागतात, जरी त्या कृतघ्नपणे वागल्या तरीसुद्धा...हे असलं वाचण्यात मला खरंच स्वारस्य नाही वाटत. अर्थात जुन्या प्रेमापोटी म्हणा, किंवा समोर आलंय तर वाचलं पाहिजे म्हणून म्हणा, मी अजूनही ते वाचतेच. पण गेली काही वर्षं, मला वाटतं त्यांच्या स्वतःविषयी पुस्तकानंतर, त्यांच्या सगळ्या लेखांचा केंद्रबिंदू ते स्वतःच असतात. त्यांचे छंद, त्यांचे मित्र, त्यांच्या मुली, युनिव्हर्सिटीतलं फिरणं वगैरे वगैरे. हे एखाद्या वेळेला वाचायला ठीक आहे हो, पण सारखं तेच? म्हणजे स्वतःविषयी माणसाने लिहू नये असं नाही. लिहावंच. मला त्यांचं अकरावीतले (किंवा तत्सम कितवीतले तरी) दिवस आवडलंच होतं. पण त्यातला सच्चेपणा आताच्या लिखाणामध्ये असतो?

    - अनघा

    ReplyDelete
  26. Maza pan ek moththa thanks! asa avchatanvar lihaychi garaj hoti khoop.

    ReplyDelete
  27. अनघा, आधीचेही अवचट पुणेरी 'स्व'विषयीच नव्हते का? मग त्या स्व बद्दल (विशेष न) सांगण्यासारखं सगळं संपलं की मग विशेष स्व बद्दल अविशेष सगळं सांगायला सुरुवात. खरं तर ज्या सुरुवातीच्या (उदा. माणसं) पुस्तकांसाठी अवचटांचा बचाव करायची नैतिक जबाबदारी तुम्हाला वाटली ती पुस्तकंही त्या माणसांपेक्षा स्व च्या सामाजिक जाणीवांबद्दलची होती. आणि हा ब्लॉग व मोस्ट कॉमेंट्स जरा दुसऱ्या, कट्ट्यापुरती पुणेरी बंडखोरी पेनफुली अंगी बाणवणाऱ्या पुणेरी स्व बद्दल आहेत. एक कुणीतरी कोल्हापुरी, पण स्वच. मध्यमवर्गानं एकमेकांच्या स्व बद्दल आगपाखड करतानाही स्वतःचा स्व कसा सोडावा? वाचावंसं वाटत नाही तर वाचू नये. पण अवचटांचं नाव आहे म्हणून वाचायची नैतिक जबाबदारी वाटतेच ना तुम्हाला? ही आगपाखड मग अशी नैतिक जबाबदारी वाटणाऱ्या स्व बद्दल आहे. असं वाटणं कंपल्सरी नाही पण तुम्हाला तसं होतं. हिंदी इंग्लिश मध्येही असं साहित्य असणारच. सगळ्या भाषांत असेल. ते काही पॉप्यलर किंवा इंटरनॅशनल होऊन डेक्कनला मिळणार नाही. त्यांच्या त्यांच्या पुण्यात राहील. अवचट मिळतील का महाराष्ट्राबाहेर? पण बाबूराव बागूल मिळतील. कारण बागूल ज्या स्व बद्दल लिहीत तो आपोआपच मोठा होतो, छोटा नाही. त्यांचा नायक थेट मुक्तपणे स्वतःबद्दल बोलतो, ओरडतो, रडतो. स्वतःच्या (पण "व्यापक, सामाजिक") दुक्खानं. दुसऱ्याचं दुक्ख बघून नाही. अवचटांनी किंवा पुलं नी स्वतःच्या दुक्खांबद्दल असं मोकळेपणानं लिहिलं असतंच तर? हा ब्लॉग आवडणऱ्यांनी ट्राय करून बघावं. य़शवंत पाठकांनी केलेलं ग्रंथालीचा चान्स मिळाला तेव्हा. - विलास

    ReplyDelete
  28. विलासराव, अनघांनी काय लिहिलंय ते कळलं, तुम्ही काय लिहिलंय ते काही सगळं कळलं नाही. बहुधा माझ्याही मध्यमवर्गीय स्व मुळे की काय?
    ही पोस्ट आणि बहुतेक सगळ्या कॉमेंट्समधून मध्यमवर्गीय जाणिवा झिरपत आहेत हे मान्य. पण अवचट मध्यमवर्गाचेच लेखक असल्यामुळे ते साहजिकच नव्हे काय? त्यांच्यावर प्रेम करणारेही मध्यमवर्गीयच आणि शिव्या घालणारेही...पण म्हणून, कशाला शिव्या घालता? तुम्ही पण तसलेच..असं म्हणता येईल का?

    गोंधळच आहे हा...मग समीक्षा करावीच कशाला कुणी कुणाची? जे या चौकटीच्या बाहेर आहेत, त्यांना अवचटांचं सोयरसुतक असायचं कारण नाही..आणि जे आतच आहेत त्यांना अवचटांना नावं ठेवायचा अधिकार नाही...नाही का?

    ReplyDelete
  29. प्रॉब्लेम आहे तो शिव्या घालण्या किंवा प्रेम करण्याबद्दल नाही. ते दोन्ही (i.e. त्यापैकी एक) करत असताना होणाऱ्या मॉरल कुतरओढीबद्दल आहे. मध्यमवर्ग काही अवचटांच्यावर प्रेम किंवा राग करणाऱ्या दोन कॅंप्समधे नाही फक्त राहात. लोकमतची ऑक्सिजन सप्लीमेंट पहाता मध्यमवर्गाला रेप्रेझेंट करण्याचाही अधिकार (मध्यनवर्गाच्या बदललेल्या डेमॉग्राफिक कॉंपोझिशनमुळे) आता अवचट-पुल-रेलेटिव्ह वाचकवर्गाला नाही, हाच काय तो अधिकाराचा पॉईंट. या ऑक्सिजनचे वाचक लेखक साबुदाण्याच्या खिचडीत किंवा तशा गोषटींत अडकून नाही बसलेले. पण (जरा लोअर, पण) मिडल क्लासच. समीक्षा कुणीही कुणाचीही करावी, पण जितके अवचट बोअर तितकीच समीक्षाही, तर मग काय करावे? -विलास

    ReplyDelete
  30. Hi,
    Mi pan avachatanchi barich pustaka eka magun ek vachat hoto..ani maza ha pravas "Punyachi Apurvai" chya pahilya 30-40 paananvar sampla..
    ya pudhe suddha Avachatanch farasa kahi vachin asa vatat nahi..tech tech n tech tech..
    ha lekh khup avadla!

    Thanks,
    Gandhar

    ReplyDelete
  31. Got the reference of your "Blog"in Monthly Lalit,
    Jan,2011issue.Thanks to Mukund Tanksale.
    Appreciate your views about Dr.Anil Awachat.
    Please keep it up.
    Jaya Natu
    Belgaum

    ReplyDelete
  32. देशात कुठलाही माल घ्यायला कायम तयार असलेले लोक सापडतातच. त्यामुळे दुकान बंद ठेवता येत नाही.
    एकाच प्रकारचे काम तुम्ही ५०० वर्षे सुध्धा करू शकता. आता या वर काय करणार ?

    ReplyDelete
  33. सकाळमध्ये आता अनिल अवचटांनी नवीन दुकान उघडलंय..सटरफटर वस्तू आणि खेळण्या-बिळण्यांचं..

    ReplyDelete
  34. भन्नाटपणे मांडलेलं सत्य.....पोस्टमेनॉपॉझल समाजवाद ! पु.लं हे performer म्हणून चांगले होते. विनोद वाईट...लेखक वाईट. अनिल अवचटांच लेखन इतके आवडत का नाही ते ह्या लेखामुळे लक्षात आलं.पण आपल्याकडे बहुतांशी लेखन तसेच आहे असेही वाटते.बर्तोलुचीच्या ‘शेल्टरिंग स्काय’ या चित्रपटाची आठवण जागविल्याबद्द्ल धन्यवाद. बाप रे..हदरवणारा आणि जगण्याच्या मूल्य संकल्पनांचा पुनर्विचार करायला लावणारा..तसाच एक "कंदाहार" नावाचा चित्रपट. धन्यवाद.

    ReplyDelete
    Replies
    1. पुलंचा विनोद वाईट? लेखक वाईट? पुलंच्या श्रुतिका, रेडिओ वरील भाषणे? ऐकल्या किंवा वाचल्यात का आपण? इतका संवेदनशील, प्रतिभावान लेखक झाला नाही मी तर म्हणेन. आता ते पुण्यात येऊन लिहिते झाले हा त्यांचा दोष म्हणावा का?

      Delete
  35. डेंजर... एकदम सही... अगदी कानफटात मारल्यासारखा लेख...

    ReplyDelete
  36. या लेखातून अवचट लेखन रतीबावर ज्या पद्धतीनं थेट भाष्य केलेलं आहे ते काबीले तारीफ. आणि शेवटी जे पॅकेजडीलचं वर्णन आलं आहे ते तर बेहद्द भारी आहे. एकदम वस्तुस्थितीचं नेमंक वर्णन! पण उच्चमध्यमवर्गाची मोनोपली साहित्यवर्तुळातही दंडुकेशाही करत असल्यानं यातलं मर्मभेदी विश्लेषण फारसं कुणी मनाला लावून घेईल असं वाटत नाही. रविवारच्या पुरवण्यातले रतीब सुरुच राहतील यांचे! एकवेळ रविवार थांबतील कंटाळून पण रतीब तहहयात..!

    ReplyDelete
  37. Je satya yachi dola yachi dehi pahile aahe khup javaloon, tech vachanatun hi lonkanna kalu shakte. Bare vatle. Unfortunately, people statr out by being humane and genuine. Somewhere along the way, they lose track and become self absorbed. We see it in all the fields. It's upto us what to take, what to reject and when.

    ReplyDelete
  38. ज्ञानदा देशपांडे ह्यांनी हा लेख लिहिताना निव्वळ साहित्यिक दष्टिकोन बाळगत डॉ. अनिल अवचट आणि डॉ. आनंद नाडकर्णी ह्यांच्या पुस्तकांचा-लिखाणाचा विचार करून आपली मते व्यक्त केली आहेत.
    ह्या दोघांचीही ‘मुक्तांगण’ आणि ‘इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ’ ह्या माध्यमातून सुरू असलेली लोकोपयोगी, भरीव कामगिरी लक्षात घेतली तर जाणवते की आपल्या जगण्यातले, अनुभवांतले सारे काही लिखाणातून वाटून घेण्याचं त्यांचं प्रयोजन असतं.
    त्यांची पुस्तके वाचून स्वत:त सकारात्मक बदल घडवण्यास उत्सुक असणार्‍या सर्वसामान्य मंडळींना त्या पुस्तकातील साहित्यिक बाबी विचारांत घेण्याची गरज बिलकूल भासत नाही.

    ReplyDelete
  39. Dnyanada me tumchyashi poorn sahmat ahe... anil avchat yanche tech tech upadeshache dose vachun vachun ata kantala yayla laglay, vaitag yeto alikade.mage ekda Avdhoot Gupte chya " Gupte tithe Khupate" ya program madhe Anil Avchat ani Amol Gupte ale hote... tenvahi te Amol Guptela kahi boluch det navte ... Sandhi milali ki updesh chalu kartat..

    ReplyDelete
  40. चेतन, बरोबर प्रसंग सांगितलात. त्यात तर अवचट अगदी उघडेच पडले.

    ReplyDelete
  41. प्रणवचं ऑब्झर्वेशन बरोबर आहे. पुण्यात बाबा पुरंदरे, बाबा अवचट (आणि अलीकडे दाजीकाका गाडगीळ) हे कोणत्याही कार्यक्रमात (प्रकाशन, उदघाटन, शोकसभा, मर्तिकाची भजनं )कशालीही उपस्थित असतात. त्यात दुसरे बाबा पाडगावकरी शैलीत गद्य गळे काढतात ना ते पथेटिक वाटतं. पूर्वी ते १ अनुभव, २ अनुभव अशा नावांचे लेखच लिहित असत. तेव्हा संजय पवारनं कट्टामध्ये लिहिलं होतं- अनुभवांचं एक बरं असतं, ते घेता येतात अन् विकताही येतात...

    ReplyDelete